नागपूर : शहरात हृदय पिटाळून टाकणारी घटना घडली आहे. सख्या भावाने आपल्या मनोरुग्ण बहिणीची हत्या केली. मोना उर्फ खुशी किरण चौधरी (वय 38 वर्ष ) असे मृत बहिणीचे नाव आहे . तर सुरज उर्फ बाल्या लक्ष्मण रक्षक ( वय पन्नास वर्ष पडोळे नगर निवासी नंदनवन ) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना नंदनवन पोलीस स्टेशन अंतर्गत हनुमान मंदिर जवळ, पडोळे नगर येथे घडली.
आरोपी हा मजदूरीचे काम करतो, मागील काही वर्षापासून मनोरुग्ण बहिणीचा सर्व उपचार बेडवरच होता. सूत्रानुसार आरोपीची मानसिक स्थिती सतत बहिनीचा उपचार करीत असताना खराब झाली असावी , असा प्राथमिक अंदाज पोलिस लावीत आहे. याच कारणाने रोपीने आपल्या बहिणीच्या सततच्या उपचाराला कंटाळून , तिला मारहाण करून तिच्या जीव घेतला, नंदनवन पोलिसांनी आरोपी सुरजला अटक केली आहे. महत्त्वाचे म्हणजॆ सुरजवर या अगोदरर हत्या व हत्याच्या प्रयास चे गंभीर गुन्हे दाखल सुद्धा आहेत ,पुढील तपास नंदवन पोलीस करीत आहे.