नागपूर: निरोगी जीवनासाठी नियमीत सायकलींग उपयुक्त ठरते. तसेच आपल्या दैनंदिन कामात शक्य होईल, त्या ठिकाणी वाहन सोडून सायकलचा वापर केल्यास प्रदूषण नियंत्रणात आणता येईल, अशी जनजागृती रविवारी (ता. 15) शेकडोच्या संख्येत अबाल-वृद्धांनी केली. आर्ट ऑफ लिव्हींग नागपूरच्यावतीने निःशुल्क “पेडल पावर” सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील आर्ट ऑफ लिव्हींग स्वयंसेवकांसह शेकडो सायकल प्रेमी रॅलीमध्ये उत्स्फूर्तपणे रॅलीमध्ये सहभागी झाले. संविधान चौक येथून सुरु झालेली रॅली जापानी गार्डन मार्गे फुटाळा, अमरावती मार्ग – हिस्लॉप कॉलेज ते संविधान चौकात रॅलीचे समारोप झाले.
यासाठी ऑनलाईन नोंदणी राबविण्यात आली होती, हे विशेष. “ह्दयाने तरुण असणा-यांसाठी सायकलींग” य़ा थीमवर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये शहरातील विविध सायकलींग ग्रुपच्या सदस्यांनीही भाग घेतला. प्रत्येक रविवारी अशाच प्रकारे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आल्यास, शहरात नागरिकांना सायकलचा उपयोग वाढविण्यासाठी प्रोत्साहीत करता येईल, असा सल्ला देखिल अनेकांनी दिला. लोकउपयोगी उपक्रमासाठी भविष्यातही आपण आर्ट ऑफ लिव्हींग सोबत आहोत अशी ग्वाही यावेळी सहभागींनी दिली. शिस्तबद्ध पद्धतीने आयोजन केल्याबद्दल नागरिकांना आर्ट ऑफ लिव्हींगचे आभार मानले.