नागपूर : नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने माजी महापौर व माजी आमदार प्रा.अनिल सोले यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या पौर्णिमा दिवस अभियानांतर्गत मंगळवारी (ता.२३) नरेंद्र नगर चौक परिसरात जनजागृती करण्यात आली.
या अभियानाला नरेंद्र नगर चौक परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. जनजागृती दरम्यान स्वयंसेवकांनी दुकानदार तसेच नागरिकांना एक तास विद्युत दिवे बंद ठेवण्याचे आवाहन केले व नागरिकांनी देखील त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. या अभियानात स्थानिक नागरिकांनी देखील उत्साहाने सहभाग नोंदवून मनपाला सहकार्य केले.
याप्रसंगी ग्रीन व्हिजीलचे सर्वश्री कौस्तव चॅटर्जी, सुरभी जयस्वाल, मेहुल कोसुरकर, शीतल चौधरी, बिष्णुदेव यादव, श्रीया जोगे, तुषार देशमुख, पार्थ जुमडे, काजल पिल्लई आदींनी जनजागृती केली. याप्रसंगी मनपाचे कार्यकारी अभियंता श्री. राजेंद्र राठोड, श्री. दिलीप वंजारी, स्थानिक रहिवासी श्रीमती शर्मिला बरगी, श्री. फुलदास पाटील आदींची उपस्थिती होती.