पुणे कोरेगाव भीमा प्रकरणात हिंसाचार घडविल्याचा आरोप असलेल्या मिलिंद एकबोटेंना जामीन मंजूर करण्यात आला आहे. 25 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर एकबोटेंना जामीन मंजूर झाला आहे.पुणे सत्र न्यायालयाने एकबोटेंना जामीन मंजूर केला आहे. कोरेगाव भीमामध्ये हिंसाचार घडविल्याच्या आरोपात मिलिंद एकबोटेंना अटक झाली होती.
१ जानेवारीला रोजी कोरेगाव भीमा येथे शौर्य दिना निमित्ताने वंदन करण्यासाठी आंबेडकरी अनुयायी जमले होते. त्यावेळी कोरेगाव भीमा गावच्या हद्दीतील वढु रोड, डीग्रहजवाडी रोड, पुणे-नगर महामार्ग या ठिकाणी उसळलेल्या दंगलीमध्ये दगडफेक, जाळपोळीची घटना झाली होती. या प्रकरणात शिक्रापूर पोलिसांनी न्यायालयी परवानगी घेत एकबोटे यांना भादवी कलम ३०७ सह १२० (ब) सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंध कायदा कलम ३ व ४, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ७ अशा विविध कलमानुसार अटक केली होती. त्यानुसार त्यांची ७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी एकबोटे यांना सुरक्षेच्या कारणास्तव शिवाजीनगर न्यायालयात हजर केले त्यावेळी न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन काेठडी सुनावली.