Published On : Tue, Jun 25th, 2024

पुणे पोर्श कार अपघात प्रकरण; दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर

Advertisement

पुणे : काही दिवसांपूर्वी पुण्यातल्या कल्याणी नगर भागात मद्यधुंद अवस्थेत भरधाव पोर्श कार चालवत दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करण्यात आला आहे. हा मुलगा पुण्यातल्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा असून त्याला वाचवण्यासाठी कुटुंबियांकडून शर्तीचे प्रयत्न करण्यात आले होते.

अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा असे मृतकांची नावे आहेत. या घटनेने पुण्यासह देशभरात संतापाची लाट उसळली. अपघातानंतर अवघ्या 15 तासांनंतर बाल न्याय मंडळाने आरोपी मुलाला निबंध लिहिण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला.

Advertisement

बोर्डाचा निर्णय वादग्रस्त ठरल्याने त्याला पुन्हा ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल आणि आई शिवानी हेही तुरुंगात आहेत.

मुलाच्या वडिलांवर नियम डावलून पोर्श कारच्या चाव्या मुलाला दिल्याचा आरोप आहे, तर त्याच्या आईवर रक्ताचे नमुने बदलल्याचा आरोप आहे. याप्रकरणी रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरांवरही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.