Advertisement
पुणे : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार करणारा आरोपी दत्तात्रेय गाडेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. मागील दोन दिवसांपासून फरार असलेला आरोपी गाडेला पोलिसांनी अखेर अटक केली.
पुण्याच्या शिरूरमधून पोलिसांनी रात्री दीड वाजता या आरोपीला जेरबंद केलं. दरम्यान, आज शुक्रवारी 28 फेब्रुवारीला आरोपी दत्तात्रेय गाडेला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
दरम्यान मंगळवारी 25 फेब्रुवारीला पहाटेच्या सुमारास आरोपी दत्तात्रेय गाडेनं स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये तरुणीवर बलात्कार केला होता. या घटनेनंतर आरोपी फरारा झाला होता.
आरोपी गाडेचा शोध घेण्यासाठी पोलिसांची 13 पथकं तयार करण्यात आली होती. पोलिसांनी आज मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास आरोपी गाडेला शिरुर येथील एका शेतातून अटक केली.