Published On : Sat, Nov 25th, 2023
By Nagpur Today Nagpur News

मुंबईत दुकानांवरील पाट्या मराठी भाषेत लावा,अन्यथा न्यायालयीन कारवाई होणार ; बीएमसीचा इशारा

मुंबई : सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्देशानुसार मुंबईतील सर्व दुकानांवर मराठी भाषेत पाट्या लावणे बंधनकारक आहे. न्यायालयाच्या सूचना अंमलात आणण्यासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने दुकानदारांना इशारा दिला आहे.

बृहन्‍मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दुकाने व आस्थापनांवर मराठी देवनागरी लिपित ठळक अक्षरात नामफलक लावणे बंधनकारक आहे. त्‍यासाठी २४ विभाग स्तरावर दुकाने व आस्थापना खात्यातील वरिष्‍ठ सुविधाकार व सुविधाकारांचे पथक गठीत करण्यात आले आहे. या पथकाला कारवाईचे अधिकार देण्‍यात आले असून दिनांक २८ नोव्‍हेंबर २०२३ पासून कारवाई सुरु करण्यात येईल.

Gold Rate
Saturday 01 Feb. 2025
Gold 24 KT 82,700 /-
Gold 22 KT 76,900 /-
Silver / Kg 94,100 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी व्यापक बैठक घेऊन सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्देशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश सर्व संबंधितांना दिले आहेत.

त्यानुसार अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (शहर) डॉ.अश्विनी जोशी आणि उप आयुक्‍त (विशेष) संजोग कबरे यांच्‍या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करीता विभाग स्तरावर दुकाने व आस्थापना खात्यातील वरिष्‍ठ सुविधाकार व सुविधाकारांचे पथक गठीत करण्यात आले आहे.

सदर कारवाई दरम्यान ज्या दुकाने व आस्थापनांनी अधिनियमांची तरतुद व सर्वोच्च न्यायालयाचे आदेश यानुसार मराठी नामफलक मराठी देवनागरी लिपित ठळक अक्षरात लावले नसल्यास अशा दुकाने व आस्थापना मालकांवर अधिनियमातील तरतुदीनुसार न्यायालयीन कार्यवाही करण्यात येईल, असे महानगरपालिके सांगितले.

25 सप्‍टेंबर 2023 रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्‍यांना दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी देवनागरी लिपित ठळक अक्षरात लावण्याबाबत दोन महिन्यांची मुदत दिली होती. सदर मुदत दिनांक 25 नोव्‍हेंबर 2023 रोजी संपुष्टात येत असून दुकाने व आस्थापनांवर अधिनियमातील तरतुदींनुसार मराठी देवनागरी लिपित ठळक अक्षरात नाम फलकाबाबतची कारवाई मंगळवार दिनांक 28 नोव्‍हेंबर 2023 पासून सुरु करण्यात येणार आहे.

Advertisement