Published On : Wed, Dec 6th, 2023
By Nagpur Today Nagpur News

मनपाच्या हॉट मिक्स प्लांटद्वारे अल्पावधीत रस्ते दुरुस्तीचे गुणवत्तापूरक कार्य

Advertisement

नागपूर :स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूर साकारण्यासह शहराच्या सौंदर्य करण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिका विशेष कार्यरत आहे. नागपूर महानगरपालिकेच्या हॉट मिक्स प्लांटद्वारे अल्पावधीतच शहरातील रस्ता दुरुस्तीचे कार्य गुणवत्तापूर्ण केल्या जात आहेत.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी व मुख्य अभियंता श्री.राजीव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हॉट मिक्स प्लांट विभाग नियोजनबद्ध पध्दतीने गुणवत्तापूरक कार्य करीत आहे. नागपूर महानगरपालिका हॉट मिक्स प्लांट विभागाने नागपूर शहर वाहतूक पोलिस शाखा यांच्याशी समन्वय साधून युद्धपातळीवर कार्य करीत गत काही दिवसांमध्ये शहारातील रस्त्याची दुरुस्ती व डांबरीकरण केले आहे.

Today’s Rate
Saturday 05 Oct. 2024
Gold 24 KT 76,100/-
Gold 22 KT 70,800/-
Silver / Kg 93,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above


विभागातर्फे दिवस व रात्रपाळीत सरासरी 4 ते 5 टिप्पर वाहनांच्या सातत्यपूर्ण कार्यप्रणाली व यंत्रणा राबवून दिलेल्या उदिष्टाची पूर्तता करण्यात येत आहे. सदर कार्य इतर/खाजगी माध्यमातून केल्यास निर्धारित दुरुस्ती कामांसाठी जास्त खर्च अपेक्षित राहिला असता, त्यामुळे सरासरी 1.20 कोटीची महानगरपालिकेची बचत होऊन गुणवत्तापूर्वक काम विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Advertisement

विभागाने केवळ सात दिवसामध्ये केलेल्या नियोजनबद्ध व जबाबदारीपूर्वक कामासह रस्त्याच्या कामाची गुणवत्ता सांभाळल्याबद्दल व बचत केल्याबद्दल वरिष्ठांनी विभागाचे कामाचे कौतुक केले. याप्रसंगी विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. अजय डहाके यांनी कामाचे श्रेय त्यांचे वरिष्ठांना व विभागीय एकत्रित समन्वयाला दिले आहे.