पालक मंत्री बावनकुळे यांचे प्रशासनाला निर्देश
मुंबई : नागपूर जिल्ह्यातील 14 नगर परिषद व 6 नगर पंचायतीत विद्युत व तांत्रिक मंजूर पदांवर लवकरात लवकर अभियंतांची नियुक्ती करण्याचे निर्देश नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मुंबईत वरळी येथे नगर पालिका प्रशासन संचालनालयात आज नागपूर व भंडारा जिल्ह्यातील सर्व नगर परिषदा व नगर पंचायतींच्या समस्यांबाबत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सर्व मुख्याधिकाऱ्यांसह आ.समीर मेघे उपस्थित होते.
नागपूर व भंडारा जिल्ह्यातील विकास कामांना गती मिळावी याकरीता रिक्त जागा भरून काढण्यात यावे तसेच नगर पंचायत व नगर परिषदेत रोजनदारी तत्वावर अधिक काळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन वाढ व सेवनिवृत्त कर्मचाऱ्यांचे थकित वेतन मिळाण्या संदर्भातही लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आश्वासनही पालकमंत्री यांच्याकडून देण्यात आले.
नागपूर व भंडारा जिल्ह्यातील सर्व क नगर परिषद व नगर पंचायत यांना बांबु लागवड योजना महिला बचत गटांना देण्याचे निर्देशही बावनकुळे यांनी दोन्ही जिल्ह्यातील सीईओंना व आयुक्तांना दिले. या व्यतिरिक्त प्रत्तेक घरा समोर दोन झाडे लावण्यात यावी या योजनेचे पालनही करण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
पाणी पुरवठा योजना, पंतप्रधान आवास योजना व सार्वजनिक स्वच्छता अभियान या योजनांसंबंधित प्रलंबित काम पूर्ण करून लवकरात लवकर काम मार्गी लावण्याचे निर्देशही बावनकुळे यांनी यावेळी दिले. कामठी, महादुला, मौदा व हुडकेश्वर – नरसाळा येथिल प्रारूप विकास आराखडा शासनाकडे प्रलंबित असून तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना नगर विकास विभागाशी संधिबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. नागपूर व भंडारा जिल्हयातील उर्वरित विकास आराखड्यांचे प्रस्ताव तात्काळ शासना कडे पाठविण्याचे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले.