Published On : Sat, Nov 16th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात विधानसभेसाठी राहुल गांधीचा प्रचार जोरात; प्रसिद्ध रामजी- श्यामजीच्या तर्री पोह्यांचा घेतला आस्वाद!

Advertisement

नागपूर: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबरला होणार असून, 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे.या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी नागपुरात आपल्या उमेदवारांचा प्रचार केला. यासोबतच शहरातील प्रसिद्ध रामजी- श्यामजीच्या तर्री पोह्यांचा आस्वाद घेत त्यांनी सर्वांची मने जिंकली.

लोकप्रिय भोजनालयाच्या भेटीदरम्यान भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नागपूरचे दक्षिण पश्चिम उमेदवार प्रफुल्ल गुधडे आणि पक्षाचे इतर वरिष्ठ नेत्यांनी आज प्रसिद्ध रामजी- श्यामजीच्या तर्री पोह्याची चव चाखली.

Gold Rate
Monday 31March 2025
Gold 24 KT 90,500 /-
Gold 22 KT 84,200 /-
Silver / Kg 101,500 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

राहुल गांधी यांनी शनिवारी महाराष्ट्रात अनेक निवडणूक रॅलींना संबोधित केले. निवडणूक प्रचाराच्या व्यस्ततेत राहुल गांधी नागपुरातील प्रसिद्ध तारी पोह्यांचा आस्वाद घेताना दिसले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते गांधी यांनी सायंकाळी वर्धा रोडवरील श्यामजी रामजी पोहेवाला यांच्या हॉटेलमध्ये पोहोचून पोहे बनवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दक्षिण पश्चिमचे उमेदवार गुधडे यांच्यासोबत बसून तर्री पोह्यांचा आस्वाद घेतला.
त्यानंतर त्यांनी हॉटेलमध्येच बसून शेतकरी, संविधान आणि बेरोजगारी या प्रश्नांवर तरुणांच्या गटाशी चर्चा केली. आज राहुल गांधी निवडणूक कार्यक्रमादरम्यान विदर्भ दौऱ्यावर होते.


नागपुरचे तर्री पोहे हे जगभरात प्रसिद्ध आहेत. शहरातील खाद्य संस्कृतीचा मुख्य भाग म्हणून स्थानिक जनतेची सकाळचा नाश्ता म्हणून त्याला पसंती असते.


दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधींची बहीण प्रियंका गांधी वड्रा या रविवारी काँग्रेसचे नागपूर पश्चिम उमेदवार विकास ठाकरे यांच्या समर्थनार्थ बाइक रॅलीचे नेतृत्व करणार आहेत.

Advertisement
Advertisement