Advertisement
नागपूर : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपच्या सर्व बड्या नेत्यांनीही राहुल यांना घेरले आहे. यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
भारतीय जनता पक्ष आपल्या सवयीप्रमाणे आरक्षणाबाबत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढून खोटा प्रचार करत आहे.
नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. फडणवीस हे खलनायक आहेत. मराठा, धनगर, आदिवासी समाज आणि इतर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देऊन फडणवीस यांनी या समाजाचा विश्वासघात केला आहे.
भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना आरक्षण, संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, असे नाना पटोले म्हणाले.