Advertisement
नागपूर: शहरातील गंगा जमुना परिसरात गुन्हे शाखेच्या सामजिक सुरक्षा विभागाने धाड टाकली. पोलिसांनी या कारवाईत अल्पवयीन मुलीसह दोन पिडीत महिलांची सुटका केली आहे.
लकडगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही करवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी दोन महिला दलाला यांना अटक केली.दिपा राजु कंचन (वय ५० वर्ष) निलम उर्फ गुड्डी उर्फ कल्लूबाई मनिष धनावत (वय ५५ वर्षे) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत.
दोन्ही महिला मध्य प्रदेश येथील असून सध्या गंगाजमुना वास्तव्यास आहेत. आरोपी महिलांच्या ताब्यातून पोलिसांनी ३२ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच आरोपी महिलांना लकडगंज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तसेच पोलिसांनी आरोपी महीलांविरोधात
कलम १४३, ३(५) भा.त्या.सं. सहकलम ३, ४, ५, ७ पिटा ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे.