नागपूर : शहरातील बदनाम वस्ती असलेल्या गंगाजमुनातील देहव्यापाराचे अड्डे बंद करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गंगा-जमुना रेडलाईट परिसरात पोलिसांनी धाड टाकली. अल्पवयीन मुलींकडून बळजबरीने देहव्यापार करवून घेण्यात येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या अनुषंगाने ही छापेमारी करण्यात आल्याची माहिती आहे.
पोलीस उपायुक्त (डीसीपी) गोरख भामरे यांच्या नेतृत्वाखाली झोन 3 च्या पोलिसांनी एका गुप्त माहितीच्या आधारे कारवाई केली . अल्पवयीन मुलींना कोंडून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याची पडताळणी करण्यासाठी पोलिसांनी गंगा जमुना परिसरात धाड टाकली.
कारवाईदरम्यान सुमारे अर्धा डझन महिलांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. झोन 3 पोलीस पथक गंगा-जमुना रेडलाईट परिसरात अल्पवयीन मुलांचे शोषण होत आहे का याचा तपास करीत आहेत.समाजातील या घृणास्पद प्रथांचे उच्चाटन करण्यात मदत करण्यासाठी पोलिसांनी मानवी तस्करी किंवा अल्पवयीन मुलांचे शोषण यासंबंधी कोणतीही माहिती मिळाल्यास पोलिसांना सूचित करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
दरम्यान अल्पवयीन मुलींकडून देहव्यापार करवून घेणे गुन्हा आहे. गंगाजमुनाच्या अड्ड्यसमाज आणि परिसरावर वाईट परिणाम होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.