नागपूर : सावनेर हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गुप्त खबरीच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तेलकामठी शिवारात एका फॉर्म हाउसवर सुरु असलेला क्रिकेट सट्ट्यावर धाड टाकली. बांग्लादेश-अफगाणिस्तानमध्ये खेळल्या जात असलेल्या एक दिवशीय क्रिकेट सामन्यावर आरोपी सट्टा लावून जुगार खेळत होते. दिपक शंकर गोस्वामी( वय ३४ वर्ष रा देवकृपा सोसायटी, वर्धमान नगर, नागपूर) , कृणाल बबनराव धापोडकर ( वय ३४ वर्ष, रा मस्कासाथ इतवारी, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहेत.
माहितीनुसार आरोपींकडून एकूण ६१,००५/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधिक्षक संदीप पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सपोनि राजीव कर्मलवार, आशिषसिंग ठाकुर, सफ चंद्रशेखर गडेकर, पोहवा राजेंद्र रेवतकर, अमोल कुथे, पोना किशोर वानखेडे, आशिष मुंगले, उमेश फुलबेल, पोशि राहुल साबळे, तसेच पोलीस स्टेशन सावनेर चे पोलीस निरीक्षक रविंद्र मानकर, सौ गणेश राय, पोना रवि मेश्राम, पोशि सचिन लोणारे यांनी संयुक्तरित्या पार पाडली.