Advertisement
नागपूर : मुंबईजवळ दुरंतोला झालेल्या अपघातानंतर रेल्वे वेळापत्रक अद्यापही सुरळीत झाले नाही. मार्गाची दुरूस्ती झाली असली तरी त्या परिसरातून कॉशन आॅर्डरनुसार ट्रेन चालविल्या जातात. त्यामुळे काही गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा उशिरा धावत आहेत.
मंगळवारी उशिरा धावणाºया गाड्यात १२८५९ मुंबई – हावडा गीतांजली एक्स्प्रेस ३ तास, १२४१० गोंडवाना निजामुद्दीन रायगड एक्स्प्रेस सव्वा दोन तास, १६०९४ लखनौ – मद्रास एक्स्प्रेस २.४० तास, ११०४६ दीक्षाभूमी एक्स्प्रेस ३ तास, १२६७० छपरा – मद्रास १.४५ तास आणि १२१०६ गोंदिया – मुंबई विदर्भ एक्स्प्रेस निर्धारित वेळेपेक्षा ६ तास उशिरा धावत होती.