Published On : Fri, Jul 6th, 2018

खंडाळा घाटात रेल्वेचा डब्बा घसरला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम

पुणे : पुणे रेल्वे मार्गावर असलेल्या खंडाळा येथे मदुराई एक्सप्रेसचा एक डब्बा रुळावरुन घसरल्यामुळे मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या वाहतुकीवर चांगलाच परिणाम झाला आहे. खंडाळा रेल्वे स्टेशनजवळ मदुराई एक्स्प्रेसचा शुक्रवारी (6 जुलै) पहाटे 2.45 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

लोकमान्य टिळक मुंबई ते मदुराई एक्स्प्रेस खंडाळा घाट चढून येत असताना खंडाळा रेल्वे स्टेशनजवळ गाडीच्या मागील बँकरची जोरदार धडक मागील डब्याला बसल्याने हा अपघात झाला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, बोगीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या अपघातामुळे अप लाईनवरील वाहतूक विस्कळीत झाल्यानं रेल्वे सेवा उशिरानं सुरू आहे. मदुराई एक्स्प्रसेची घसरलेली बोगी हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Gold Rate
Saturday 01 Feb. 2025
Gold 24 KT 82,700 /-
Gold 22 KT 76,900 /-
Silver / Kg 94,100 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान, या अपघातामुळे पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस, पुणे -मुंबई प्रगती एक्स्प्रेस, पुणे-कर्जत व कर्जत पुणे शटल, भुसावळ पुणे एक्स्प्रेस व मुंबई पुणे, पुणे मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisement