पैसे न देणाºया प्रवाशांना मारहाण, बळजबरीने घेतले शंभर रुपये, ओखा पोरबंदर एक्सप्रेसमधील प्रकार
नागपूर: नागपूर रेल्वे स्थानक आणि परिसर तृतियपंथीयांच्या जाचातून मुक्त झाला असला तरी वर्ध्यानंतर तृतियपंथीयांची दहशत कायम आहे. मुंबईकडून नागपूरकडे येणाºया विविध गाड्यात तृतियपंथी धुमाकूळ घालतात. ज्या प्रवाशाने पैसे दिले नाही, त्यांना मारहाण करतात. कुटुंबासमोर त्यांची बेज्जती करतात. असाच प्रकार आज गुरूवारी सकाळी ५ ते ८ वाजेदरम्यान १२९०५ -ओखा पोरबंदर हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये घडला. त्यांच्याकृत्यामुळे प्रवाशात धडकी भरली आहे.
ओखा पोरबंद एक्स्प्रेस अकोला येथून सकाळी ५.२० वाजता सुटल्यावर मूतीर्जापूर स्टेशन येईपर्यंत तीन ते चार तृतीयपंथी मागच्या डब्यात चढले. गाडीत चढताच त्यांनी वसूली सुरू केली. प्रत्येकाकडून २० रुपये मागत होते. त्यांनी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मात्र, त्रास दिला नाही. बडनेरा स्टेशन येण्यापूर्वी गाडीला सिग्नल नसल्याने ग्रामीण भागात गाडी थांबताच हे तृतीय पंथीय उतरले. सकाळी ७.१५ वाजताच्या सुमारास बडनेरा स्थानकावर गाडी पोहोचली. काही वेळ थांबा घेतल्यानंतर गाडी पुढील प्रवासासाठी निघणार तोच चार ते पाच तृतियपंथी मागच्या जनरल बोगीत शिरले. तत्पूर्वी आरपीएफ, जीआरपी जवान आहेत की नाही याची खात्री करून घेतली. बोगीत शिरल्यानंतर ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना वगळता तरुणांकडून वसूली सुरू केली. शिव्या, शॉप च्या भीतीपोटी अनेकांनी १० व २० रुपये देण्याचा प्रयत्न केला. मात्र, २० रुपये देणाºयांना चक्क शिव्या घालत शंभर रुपयाची मागणी केली. पैसे न देणाºया प्रवाशांना थेट धमकी दिली. एवढेच काय तर काही प्रवाशांकडून बळजबरीने शंभर रुपये काढून घेतले. दरम्यान माझ्याकडे पैसे नाहीत, असे सांगणाºया प्रवाशाच्या गालावर मारून बळजबरीने शंभर रुपये काढून घेतले. हा सर्व प्रकार सुरू असताना मात्र, बोगीतील एवढ्या तरूणांनपैकी एकही जन पुढे आला नाही. याप्रकाराचा संताप त्यांच्यात होता. मात्र, दहा वीस तरूणांनी एकत्र येवून तृतियपंथीयांचा विरोध करण्याची हिंमत दाखविली नाही. यावेळी आरपीएफ, जीआरपीचा एकही कर्मचारीही गाडीत नव्हता. पुढे काही वेळात वर्धानंतर ग्रामीण भागात एक्स्प्रेसला सिग्नल नसल्याने पाचही तृतीय पंथीय गाडीतू उतरुन फरार झाले.
नो सिग्नलचा तृतीय पंथिंयाना होतो फायदा
नागपूर मार्गे पश्चिमेला जाणाºया गाड्या (सुपरफास्ट) वेगाने धावत असतात. परंतू भूसावळवरुन नागपूर मार्गे येणाºया विविध एक्सप्रेस आणि सुपरफास्ट गाड्यांना सिग्नल नसते तसेच गाडीची गतीही फार नसते. त्यामुळे तृतियपंथी सहज गाडीत चढतात. वसूली पूर्ण झाल्यानंतर मोठे स्टेशनयेण्यापूर्वी ज्या ग्रामीण भागात गाड्यांना सिग्नल नसते किंवा गाड्यांची गती फारच कमी होते, अशा ठिकाणी हे तृतियपंथी गाडीतून उतरुन फरार होतात.