रक्कम हवालाची असल्याची दाट शक्यता?
विदर्भ एक्स्प्रेसने जाणार होता अमरावतीला
नागपूर: कर्तव्यदक्ष आरपीएफ जवानाने सर्तकता दाखवित एका व्यक्तिला लाखो रुपयासह ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याच्या पिशवितून १२ लाख ८७ हजार ९०० रुपयाच्या चलनी नोटा (५०० च्या) जप्त करण्यात आल्या. या रकमेचा तो हिशेब देवू शकला नाही तसेच त्याने कुठलाही पुरावा सादर केला नाही. त्यामुळे संपूर्ण रक्कम हवालाची असल्याची शक्यता वर्तविण्यात आली असून हे प्रकरण आयकर विभागाकडे सोपविण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई आज मंगळवारी सायंकाळी १६.५० वाजता नागपूर रेल्वे स्थानकावर करण्यात आली.
तळेगाव येथील मन्सूख हुसैन (५५) हा अकोला, बडनेरा रेल्वेस्थानकाहून खाजगीमध्ये ट्रान्सपोर्टिंगचे काम करत असल्याचे सांगतो. मात्र, तो ट्रान्सपोर्टिंग कशाचे करतो, हे सांगू शकला नाही़ आरपीएफ जवान विकास शर्मा यांची पत्नी विदर्भ एक्स्प्रेसने मुंबईला जात होत्या. पत्नीला रेल्वेगाडीमध्ये बसविण्यासाठी ते रेल्वेस्थानकावर पोहोचले. दरम्यान फलाट क्रमांक तीनवर मन्सूख हा विदर्भ एक्सप्रेसची वाट पाहत होता. त्याच्या हातात एक पिशवी होती. अत्यंत साधरण दिसणारा मन्सुखवर कुठल्याही पध्दतीने संशय करताच येत नाही. मात्र, त्याची पिशवी थोडी वजनी वाटत असल्याने प्रवाशांच्या गर्दीतही शर्मा यांच्यातील कर्तव्यदक्ष जवान जागा झाला. त्यांनी मन्सूखची विचारपूस केली असता़़ तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. सुरूवातीला त्याने स्टाफ असल्याचे सांगून शर्माची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पिशवीत काय आहे असे विचारल्यावर १२ लाख रुपये रोकड असल्याचे सांगितले़ एवढी मोठी रक्कम पाहताच शर्मा यांनी लगेच आरपीएफ निरीक्षक रवी जेम्स यांनी माहिती कळवली. क्षणाचाही विलंब न करता आरपीएफचे पथक घटनास्थळी हजर झाले. मन्सूखला ताब्यात घेऊन ठाण्यात आणण्यात आले़ ठाण्यात त्याची सखोल चौकशी करण्यात आली. ही रक्कम मोठ्या मुलीच्या लग्नासाठी घेऊन जात असल्याचे त्याने सांगितले़ मात्र, त्या रकमेचा पुरावा, हिशेब देऊ शकला नाही. त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे असलेल्या थैलीतून १२ लाख ८७ हजार ९०० रुपये जप्त करण्यात आले. इतकी मोठी रोकड विना पावतीशिवाय घेऊन प्रवास करणे, रेल्वे नियमानुसार गुन्हा आहे. ़़ हा प्रकार हवालाचा असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे हे प्रकरण आयकर विभागाकडे सोपविण्याची प्रक्रिया सुरू होती.
विकास की नजर तेज है
गुन्हेगार कितीही चलाख असला तरी तो सापडतोच असे म्हणतात. आरपीएफ जवान विकास शर्माची नजर एवढी तीक्ष्ण आहे की, त्याच्या नजरेतून कोणताच गुन्हेगार सुटतच नाही. कारण, विकास की नजर तेज है हे वाक्य गुन्हेगारांसह सर्वांच्याच तोंडी बसले आहे, किंबहुना या जवानाची मोठी दहशतच गुन्हेगारांमध्ये निर्माण झाली आहे. तस्करांना पकडण्याचा विकास शर्मा यांचा हतकंडा आहे. नागपूर स्थानकावरील तस्करीची सर्वाधिक प्रकरणे उडकीस आणण्याचे श्रेय त्यांच्याकडे आहे.
बँकेतून काढली रक्कम
धामनगावला घराचे बांधकाम सुरू असून नुकतेच बँकेतून रक्कम काढल्याचे मन्सूूख हुसैन त्याने आरपीएफ जवान विकास शर्मा यांना सांगितले. ठाण्यात आणल्यानंतर त्याने दुसरीच कहानी बनविली. मोठ्या मुलिचे लग्न अकोल्यातील इंजिनिअरसोबत आॅक्टोबरमध्ये होणार असून, मुलाकडील लोक लग्न जुलैमध्येच करण्याचा आग्रह करत असल्याने, तयारी म्हणून एवढी रक्कम जमवल्याचे मन्सुखनी खात्रीलायक सांगितले. १२ लाख रुपये नागपुरातील इतवारी, महाल व गांधीबाग येथील नातेवाईक आणि व्यापाºयांकडून कर्जाने घेतले असून, ऊर्वरित रक्कम किराणा सामानासाठीचे स्वत:चे असल्याचेही तो सांगत होता़ मात्र, ते कर्जदात्यांची नावे सांगितले नाही. शिवाय त्याच्या सांगण्यातही विंगती दिसून येत होती. आरपीएफ जवान विकास शर्मा यांनी त्याची विचारपूस केल्यानंतर तो म्हणाला मी रेल्वेचा कर्मचारी आहे. कुठल्या विभागाचा आहे, असे म्हटल्यावर त्याने काहीच उत्तर दिले नाही. त्याने एनआरएमयु रेल्वे संघटनेचा कार्ड दाखवून आरपीएफची दिशाभूल करण्याचा पूर्ण प्रयत्न केला.