नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होत असून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी सुरु केली आहे.
यंदा अधिवेशानासाठी तारांकित प्रश्नांचा पाऊसही पडत असून विधानपरिषदेत आतापर्यंत १८०० वर प्रश्न दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. तर गुरुवारपासून लक्षवेधी सूचना स्वीकारण्यात येणार आहे.
नागपुरात होणारे अधिवेशन यंदा १४ दिवसांचे असून ७ डिसेंबर ते २० डिसेंबरपर्यंत कामकाज चालणार आहे. यादरम्यान २०२३-२४ च्या पुरवणी मागण्या, शासकीय कामकाज व शोक प्रस्ताव असेल.८ डिसेंबरलाही शासकीय व अशासकीय ठराव मांडण्यात येणार आहे.
त्यानंतर दोन दिवस कोणतेही कामकाज होणार नाही. ११ डिसेंबरला शासकीय व अशासकीय कामकाज असले. मंगळवार, १२ डिसेंबरला पुरवणी विनियोजन विधेयकासह सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव असेल.
गुरुवारला विरोधी पक्ष प्रस्ताव मांडणार आहेत. अधिवेशनाचा समारोप शासकीय कामकाजाने होईल, अशी अधिवेशनाची दिनदर्शिका विधीमंडळाकडून जारी करण्यात आली आहे.