नागपूर: राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाल्याने उन्हाच्या झळा नागरिकांसासाठी असह्य झाल्या आहेत. मात्र आता यातून थोडाफार दिलासा मिळणार आहे. हवामान खात्याने नागपूरसह विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच ऑरेंज अलर्ट जारी केला.
काल रात्री मराठवाड्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस झाला. यासोबतच विजांचा कडकडाट होता. पुढील तीन दिवस राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर नागपूर, अमरावती, वाशिम, गडचिरोली आणि मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबई शहर आणि उपनगरामध्ये 21 मार्च रोजी सकाळच्या वेळी धुकं पडण्याची शक्यता असून त्यानंतर आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर मुंबईतील कमाल तापमान तेही 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस एवढे असणार आहे.नागपूरमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता असून कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस एवढे असणार आहे.