Advertisement
नागपूर – उन्हाच्या तीव्र झळा आणि वाढलेल्या उकाड्याने त्रस्त नागपूरकरांना आज अचानक आलेल्या पावसाने थोडा दिलासा दिला. शहरात आज दुपारनंतर वादळी वाऱ्यासह हलकासा ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.
काही भागांत जोरदार वाऱ्यामुळे झाडे व फलक कोसळल्याच्या घटना घडल्या, तर काही ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला.
शहरात पावसाबरोबर आलेल्या वाऱ्यांमुळे काही भागात वीज पुरवठा खंडित झाल्याची माहितीही मिळत आहे.
अचानक आलेल्या हवामान बदलामुळे थंडावा जाणवू लागला असून, उकाड्याने हैराण नागरिकांना यामुळे थोडा आराम मिळाला आहे.