नागपूर :महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला असून ठिकठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मात्र नागपूरसह विदर्भात अद्यापही मुसळधार पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे वाढत्या उखाड्यापासून नागपूरकर हैराण झाले आहे.
नागपूर प्रदेशिक हवामान विभागाने (IMD) वर्तविलेल्या अंदाजानुसार विदर्भात पूढील काही दिवस मुसळधार पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मात्र, नागपूरसह पूर्व विदर्भात पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे हवामान खात्याच्या या अंदाजानंतर तरी पाऊस येईल का, अशा प्रतीक्षेत बळीराजा बसला आहे.
गेल्या दोन आठवड्यापासून हवामान विभागाने (IMD) विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांना सातत्याने यलो अलर्ट दिला आहे.
मात्र या अंदाजानुसार अद्याप तरी अपेक्षेप्रमाणे पाऊस पडलेले नाही. त्यामुळे आजपासून पुढील चार दिवस जारी करण्यात आलेल्या यलो अलर्टनुसार पाऊस पडेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.