Advertisement
मुंबई: घाटकोपर येथील दहीहंडीच्या कार्यक्रमात भाजप आमदार राम कदमांच्या रुपाने ‘रावणी’ चेहरा समोर आल्याची जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.
भाजप आमदार राम कदम यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमात मुलींचे हरण करण्याची भाषा केल्यानंतर आज यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने राम कदमांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी मिडियाशी बोलताना नवाब मलिक यांनी राम कदमांचा खरपूस समाचार घेतला.
घाटकोपरमधील दहीहंडीच्या कार्यक्रमात भाजप आमदार राम कदम हे मुलींचे हरण करण्याची भाषा बोलतात. कुणाला कुठलीही मुलगी पसंत पडली तर त्या मुलींचे हरण करणार अशी भाषा वापरतात. त्यामुळे आजपासून राम कदम यांचे नामकरण रावण झालेले असून यापुढे ते रावण कदम म्हणून ओळखले जाणार असल्याची प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली.