Advertisement
मुंबई – इतकं धादांत खोटं बोलणारं सरकार आणि पंतप्रधान मी आजपर्यंत कधीच पाहिलेलं नाही अशी बोचरी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. एल्फिन्स्टन आणि परळ ब्रिजवरील दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर राज ठाकरे यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर सडेतोड टीका केली.
सरकार आपली आश्वासनं पुर्ण करत नाही आहे असं वाटतं का ? विचारलं असता राज ठाकरे बोलले की, ‘हे खोटं बोलूनच सत्तेवर आले आहेत. सगळा सोशल मीडिया पाहिल्यावर लक्षाय येतं की निवडणुकीआधी काय बोललेत आणि नंतर काय बोलतायत. इतकं धादांत खोटं बोलणारं सरकार आणि पंतप्रधान मी कधीच पाहिलेलं नाही. आणि या सगळ्याचा शेवट काय असणार तर अमित शहा येणार आणि म्हणणार हा चुनावी जुमला आहे’.