Published On : Wed, Mar 5th, 2025
By Nagpur Today Nagpur News

‘मुख्यमंत्रीसाहेब, कोरटकर प्रकरणात तत्परता दाखवा’;राजे मुधोजी भोसले यांचे फडणवीसांना निवेदन

Advertisement

नागपूर : राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करीत इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारा नागपुरातील कथित पत्रकार प्रशांत कोरटकर याच्यावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. याकरिता सकल मराठा महासंघाच्यावतीने राजे मुधोजी भोसले यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन केली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, कोरटकर प्रकरणात तत्परता दाखवा, अशी मागणी भोसले यांनी निवेदनात केली.

जिथे असाल तिथे येऊन ब्राह्मणांची ताकद दाखवू, तुम्ही कितीही मराठे एकत्र करा,“ असे म्हणत या कोरटकर यांनी सावंतांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि घरात येऊन मारण्याची दिली धमकी दिली आहे. तसेच कोरटकर याने राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले, या प्रकरणी कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात प्रशांत कोरटकरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र अद्यापही त्याला अटक करण्यात आलेली नाही.

Gold Rate
thursday 06 March 2025
Gold 24 KT 86,600 /-
Gold 22 KT 80,500 /-
Silver / Kg 97,500 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

संपूर्ण महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण होऊन दंगली भडकविण्याचा प्रयत्न प्रशांत कोरटकर याने केला आहे. त्यामुळे त्याला त्वरित अटक करण्यात यावी. नागपूर, जालना व इतर ठिकाणी दाखल गुन्ह्यात जामीन मिळू नये अशी व्यवस्था करावी.

कोल्हापूर पोलिसांनी न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडावी. कोरटकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. कोरटकरला फरार होण्यास मदत करणाऱ्यांवर कारवाई करावी तसेच त्याची संपत्ती सरकार जमा करावी. या गंभीर प्रकरणात कोरटकरवर कारवाई होण्यासाठी सरकार, पोलीस प्रशासन व अन्य विभागाची भूमिका सकारात्मक असावी, असे निवेदन राजे मुधोजी भोसले यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कार्यालयात पाठवले आहे.त्यावर आता मुख्यमंत्री फडणवीस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement