Advertisement
मुंबई – लोकशाही मार्गाने चालणार्या सरकारला सर्कस बोलणार्या राजनाथसिंह यांचे ‘अनुभवाचे बोल’ आहेत अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
केंद्रीयमंत्री राजनाथसिंह यांनी रिंगमास्टरच्या चाबूकने महाविकास आघाडी सरकार चालवले जात असल्याचे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याला नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
महाराष्ट्रामध्ये लोकशाही मार्गाने सरकारचे काम सुरू आहे. कोरोना काळात सरकारने केलेल्या कामाचे ICMR ने मुंबई मॉडेलची चांगली स्तुती केली आहे. मात्र असे असताना
केंद्रीयमंत्री राजनाथसिंह रिंग मास्टरच्या चाबूकने चालवले जाणारे सरकार असे वक्तव्य करत आहेत. या वक्तव्याचा नवाब मलिक यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.