Published On : Tue, Aug 29th, 2023
By Nagpur Today Nagpur News

सुरक्षा जवानाकरीता एनसीसी कडुन राखी संकलन

Advertisement

आज दि 29 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता 20 महा. बटालीयन एन.सी.सी. युनिट, धनवटे नॅशनल कॉलेज, नागपूर कडुन आपल्या देशाच्या रंक्षणासाठी सीमेवर असणार्‍या सुरक्षा जवानाकरीता रक्षाबंधनानिमीत्य महाविद्यालयातील एन.सी.सी. कॅडेटनी कॅप्टन डॉ. सुभाष दाढे यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयात राख्या गोळा करण्याच्या उपक्रम राबवीला, कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळचे मुख्य उप संपादक श्री नरेश शेळके, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ओ एस देशमुख, उपप्राचार्या डॉ भारती खापेकर, यांच्या शुभ हस्ते आयोजित करण्यात आला. डॉ सुभाष दाढे, ए.एन.ओ एन.सी.सी. यांनी प्रास्ताविकातुन उपक्र्रमाचे महत्व सांगीतले. या प्रसंगी आय. क्यु. ए. सी. समन्वयक डॉ के डी मेघे, डॉ. देवेंद्र वानखडे, डॉ वंदना इंगळे, एन एस एस प्रमुख डॉ. राजकुमार गोस्वावी, डॉ के के अस्कर, प्रा. सुरेन्द्र गहेरवर, डॉ. पराग जोशी, प्रा. रवींद्र गुंडे, कनिष्ट महाविद्यालय पर्यवेक्षक प्रा. जयंत जीचकार सह सर्व महाविद्यालयाचे प्राध्यापक वुंद व एन.सी.सी. चे कॅडेट उपस्थित होते. या उपक्र्रमाला महाविद्यालयातुन चांगला प्रतिसाद मिळाला सर्व राख्या सुरक्षा जवानाकरीता सीमेवर पाठविण्यात येईल. या उपक्रमाच्या यषस्वितेसाठी एन.सी.सी. च्या कॅडेटनी अथक परीश्रम घेतले.

Advertisement

Gold Rate
Thursday 09 Jan. 2025
Gold 24 KT 77,900 /-
Gold 22 KT 72,500 /-
Silver / Kg 90,600 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above