नागपूर : बहीण -भावाच्या प्रेमाचे प्रतीक म्हणजे रक्षाबंधन सण आहे. आज रक्षाबंधनच्या मुहूर्तावरून लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. भद्राकाळामुळे मुहूर्ताबाबत लोकांमध्ये गोंधळ निर्माण झाला असून हा सण नेमका किती वाजता साजरा करायचा असा प्रश्न पडला आहे. 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट या दोन्ही दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. यासोबतच रक्षाबंधनाला पौर्णिमेचा योगायोग असणार आहे, जो खूप खास मानला जातो.
रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त, भाद्रचा काळ आणि शुभ योगायोग-
शास्त्रानुसार भद्राकाळात रक्षाबंधन साजरे करू नये, असे करणे अशुभ मानले जाते. 30 ऑगस्टला रात्री 9.02 वाजतापर्यंत भद्राकाळ असेल. त्यानंतर रक्षाबंधन साजरे केले जावू शकते. 31 ऑगस्ट रोजी सकाळी 7.5 मिनिटांपर्यंत राखी बांधता येईल श्रावण पौर्णिमा तिथीची सुरुवात – 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10.59 वा पौर्णिमा तिथी समाप्त – 31 ऑगस्ट सकाळी 7:05 वाजता रक्षा बंधनाला पौराणिक महत्त्व –
भारतीय संस्कृतीमध्ये राजसूय यज्ञादरम्यान, द्रौपदीने तिच्या रेशमी कापडाचा एक तुकडा भगवान कृष्णाला रक्षासूत्र म्हणून बांधला होता. यानंतर बहिणींनी भावाला राखी बांधण्याची परंपरा सुरू झाली. तसेच, पूर्वीच्या काळी ब्राह्मण यजमानांना राखी बांधत असत आणि त्यांना शुभेच्छा देत असत. या दिवशी वेदपाठी ब्राह्मण यजुर्वेदाचे पठण सुरू करतात. म्हणूनच रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजेच श्रावण शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी शिक्षण सुरू करणे शुभ मानले जाते.