शटडाऊनच्या काळात टँकरद्वारेही पाणीपुरवठा राहणार बंद
नागपूर: मनपा व ऑरेंज सिटी वॉटर यांनी जलकुंभ स्वच्छ करण्यासाठी सुरक्षित व शास्त्रीय पद्धत अमलात आणली आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी मनपा-OCWने ही पद्धत सुरु केली व प्रत्येक जलकुंभ वर्षातून एकदा स्वच्छ करण्याचा संकल्प केला. सध्या या मोहिमेची ६ ठी फेरी सुरु आहे.
प्रत्येक घराला स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा करण्याच्या आपल्या वचनबद्धतेला अनुसरत मनपा-OCWने जलकुंभ स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत २३ नोव्हेंबर २०२० रोजी राम नगर जलकुंभ स्वच्छतेचे काम हाती घेण्यात येत आहे. या कामामुळे २३ नोव्हेंबर २०२० (सोमवार) रोजी राम नगर जलकुंभावरील खालील भागांचा पाणीपुरवठा बाधित राहील:
पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग: २३ नोव्हेंबर २०२० (सोमवार)
धरमपेठ, धरमपेठ Extension,खरे Town त्रिकोणी पार्क , गांधी नगर, हिल टोप , कारपोरेशन कॉलोनी, शीवाजीनगर, खरे टाऊन, भगवाघर लेआऊट, त्रिकोणी पार्क, धरमपेठ, काचीपुरा स्लम MSEB कार्यलया मागचा भाग
यादरम्यान टँकरद्वारे पाणीपुरवठाही शक्य होणार नसल्याने मनपा-OCW यांनी नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करण्याचे व सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
NMC-OCW have appealed citizens to co-operate and if they have any complaints regarding water supply or need information please do contact @ NMC-OCW’s Toll Free Number 1800 266 9899 at any time.