मुंबई: योग गुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदला आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे.
याप्रकरणी न्यायालयाने तब्बल 4 कोटींचा दंड ठोठावला आहे. मंगलम ऑरगॅनिक्स लिमिटेडने दाखल केलेल्या ट्रेडमार्क उल्लंघन केल्या प्रकरणी पतंजलीच्या कापूर उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. 2023 पतंजलीला यासंदर्भात निर्देश देण्यात आले होते.
मात्र या आदेशाचे उल्लंघन केल्याने उच्च न्यायालयाने ही कारवाई केली आहे. सुनावणी दरम्यान पतंजलीने न्यायालयाची बिनशर्त माफी देखील मागितली आहे.
पतंजली एक श्रीमंत कंपनी असून आदेश दिल्यानंतर पतंजली फक्त उत्पादनाची विक्री करत नव्हती, तर त्याचे उत्पादन सुद्धा सुरु होते, अशा शब्दात न्यायालयाने पतंजलीला फटकारले आहे.
इतके नाही तर न्यायमूर्ती आर.आय. छागला यांच्या एकल खंडपीठाने पतंजलीने जाणूनबुजून न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे म्हणत 4 कोटींचा दंड ठोठावला आहे.