नागपूर : मद्यधुंद अवस्थेत भरधाव मर्सडिज कार चालवत दोन दुचाकस्वार युवकांना चिरडणाऱ्या ३९ वर्षीय आरोपी महिला रितिका उर्फ रितू दिनेश मालू मोठा धक्का बसला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज आरोपी रितू मालू हीचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. या प्रकरणी न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी पार पडली.
२५ फेब्रुवारी २०२४ रोजी मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास रितिका हिने मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगात मर्सिडिज कार चालवित मोहम्मद हुसैन गुलाम मुस्तफा (३४, रा. नालसाहब चौक) व मोहम्मद आतिफ मोहम्मद जिया (३४, रा. जाफरनगर) हे दोन तरुण मित्र स्वार असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या घटनेत दोन्ही युवकांचा मृत्यू झाला.
आरोप रितिकाने सुरुवातीला सत्र न्यायालयात अर्ज दाखल करून अटकपूर्व जामीन मागितला होता. मात्र तो २४ मे रोजी फेटाळण्यात आला. परिणामी, तिने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.आज न्यायालयाने सुनावणीत तिचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.