शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
रामटेक: रामटेक येथे नुकतेच दिवाणी न्यायाधीश माणिक वाघ यांचे मार्गदर्शनाखाली कायदेविषयक जनजागरूतीचे आयोजन करन्यात आले होते . दिवाणी न्यायालय तर्फे काढण्यात आलेल्या पदयात्रेत शालेय विद्यार्थ्यानी उत्स्फूर्तपणे मोठया उत्साहात सहभाग दर्शविला.
माननिय उच्च न्यायालय मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूर यांच्या आदेशान्वये महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती अभियानांतर्गत तालुका विधी सेवा समिती रामटेक व समर्थ हायस्कूल रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधिश माणिक वाघ यांनी हिरवी झेंडी दाखवून पदयात्रेचा शुभारंभ केला.याप्रसंगी सहदिवाणी न्यायाधिश व्ही. पी. धुर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती.समर्थ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसह वर्ग शिक्षक सुद्धा याप्रसंगी सहभागी झाले होते.
या पदयात्रेमध्ये पोलीस निरीक्षक दिलीप ठाकुर , तालुका वकील संघाचे अध्यक्ष एम. एन. नवरे, सचिव महेंद्र येरपुडे , ए.व्ही.गजभिये, पी.बी.बांते, एस.एस.खंडेलवाल, हटवार आदि वकील वर्गाची आवर्जुन उपस्थिती होती.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता समर्थ हायस्कूलचे बघेले सर व पावसे सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.पदयात्रेत न्यायालयीन कर्मचारी सहाय्यक अधिक्षक रेवतकर, कोतेवार,वरिष्ठ लिपीक सुधीर तालेवार, पिंजरकर, शेरके, पराते, खापरे, कनिष्ठ लिपीक विनोद बाजारे, खडसे, मुळे, आकाश येरपुडे , महाजन, हनवतकर,सौ. अभिलाषा यादव,लोखंडे,शिपाई सुरपाम,काकडे,धुळे,कटारे हे विद्यार्थ्यांसह मोठया उत्साहात सहभागी झाले होते.