Published On : Thu, Sep 20th, 2018

रामटेक येथे परमात्मा एक आनंदधाम व नगर परिषद यांचे वतीने राबविले स्वछता अभियान

Advertisement

रामटेक: परमात्मा एक आनंदधाम रामटेकच्या वतीने महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने व्यसनमुक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले तसेच स्वच्छतेचे ब्रँड अँबेसेडर लक्ष्मणराव मेहर बाबूजी यांच्या नेतृत्वाखाली रामटेक नगरीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले यावेली रामटेक नगरीतील गांधी चौक ,बस स्टोप व विविध मोक्याच्या ठिकाणांची साफ सफाई करण्यात आली.

या स्वच्छता मोहोमेत मोठ्या प्रमाणावर परमात्मा एक सेवक ,नागरिक ,नगर परिषद कर्मचारी सहभागी झाले होते. ही स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी नगराध्यक्ष दिलीप देशमुख, नगरसेवक संजय बिसमोगरे,प्रवीण मानापुरे,रामा अडामे,नगरसेविका लता कामळे,शिल्पा रणदिवे,उजवला धमगाये,तसेच गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वच्छता मोहिमेच्या वेळी उपस्थितांना संबोधित करतांना मेहर बाबूजी म्हणाले की,”आपले नगर,आपले गाव नियमितपणे स्वच्छ आणि सुंदर ठेवणे ही आपली जबाबदारी आहे आणि कर्तव्यही आहे.

Gold Rate
Monday 31March 2025
Gold 24 KT 90,500 /-
Gold 22 KT 84,200 /-
Silver / Kg 101,500 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्यासाठीआपण वेळोवेळी सहकार्ययाची भावना ठेवून कार्ये केली पाहिजेत”

विजय हटवार यांनी आपल्या भाषणात सांगितले की,”परमात्मा एक सेवक सातत्याने समाजाला उपयोगी पडतील अशा प्रकारची कामे करून रामटेक नगरीचा मानसन्मान वाढवीत आहे.मेहर बाबूजींच्या मार्गदर्शनात स्वछतेचे काम सुरू आहे हा स्तुत्य उपक्रम आहे” यावेळी नगराध्यक्ष दिलीप देशमुख, भाजप ओबीसि मोर्चा चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी भारतीय खाद्य निगम सदस्य विजय हटवार,नगर परिषद उपाध्यक्ष प्रभाकर खेडकर, सत्ता पक्ष नेते आलोक मानकर,नगरसेवक प्रवीण माना पुरे ,संजय बिसमोगरे,रामानंद अडामे ,नगरसेविका लता कामळे, चित्रा धूरइ ,उजवला धमगाये,ग्रामीण पत्रकार संघ चे अध्यक्ष राकेश मर्जीवे ,यांनीही स्वच्छता मोहिमेत सक्रीय सहभाग घेतला.कार्यक्रमाच्या यशस्वीत्यासाठी प्रभुनाथ कोयपरे,बजरंग मेहर,दीक्षा साठवणे,प्रीती मेहर,तसेच नगर परिषदेचे कर्मचारी व रामटेककर नागरिक यांनी प्रयत्न केले.

Advertisement
Advertisement