पवनी जवळ झाला भीषण अपघात
.
रामटेक : नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वर दिनांक 11 जुलाइ बुधवार ला रात्री १० वाजताचे सुमारास पवनी जवळील चिंधाई माता मंदिरा समोर जंगली डुक्कर रस्ता ओलांडत असतांना आडवा आल्याने वायु वेगाने नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या बलेनो गाडी क्रमांक एम एच-४९/ए एस-३७४९ ने जंगली डुक्करला जोरदार धडक दिली. चालकाचे वाहनवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याचे कडेला२००मीटर अंतरावर उभ्या असलेल्या ट्रक क्रमांक जी जे०१/डी एक्स-१८७५ ला मागे जोरदार धडक मारली यात रामकीशोर देवीलाल डहरवाल(५२)याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर तीन महिन्यांच्या काव्यासिंगअजय शिवने(३महिने)या चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य पाच जण गंभीर जखमी झाले. धडक इतकी जबर होती की,रान डुकराचे दोन तुकडे झाले होते.
प्राप्त माहितीनुसार कुरई(मध्यप्रदेश) येथील डहरवाल व शिवने कुटुंब तीन महिन्याचा मुलगा काव्यासिंग अजय शिवने याला उपचाराकरिता नागपूर येथे आणत असतांना पवनी जवळ हा भीषण अपघात झाला. या अपघातात चिमुकला काव्यासिंग अजय शिवने,रामकिशोर देवीलाल डहरवाल(५२) ठार झाले तर सौ रोशनी अजय शिवने(२५)सौ. दिप्ती गोविंद डहरवाल(३५),गोविंद डहरवाल(४५),चालक अस्फाक शब्बीर खान व एक अन्य असे पाच जण गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती कळताच देवलापरचे ठाणेदार प्रवीण बोरकुटे, संदीप कडू, अमोल वाघ, सतीश नागपुरे, संतोष बाट,गजानन जाधव व पवनी येथील गावकरी घटनास्थळी पोहचून गाडीत अडकलेल्या मृतक व जखमींना बाहेर काढण्याकरिता पोलिसांना मदत केली. जखमींना उपचाराकरिता देवलापार ग्रामीण रुग्णाग्यात दाखल केले. डॉक्टरांनी प्रथोमपचार करून प्रकृती चिंताजनक असल्याने सर्वच जखमींना पुढील उपचार करीता नागपूरला हलविण्यात आले.
या दुर्दैवी घटनेत तीन महिन्यांच्या चिमुकल्याला जीव गमवावा यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
वायू वेगाने येणाऱ्या बलेनो गाडीच्या धडनकेने गाडीचा पार चेंदामेंदा झाला होता. आरोपी चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात शरीराचे दोन तुकडे झालेल्या रानडुक्करला पवनी चे वनपरिक्षेत्र अधिकारी रितेश भोंगाडे यांचे उपस्थित पंचनामा करून अंतिमसंस्कार करण्यात आले. तर मृतकांचे रामटेक येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाहिकाना सोपविण्यात आले.