रामटेक: नुकत्याच लागलेल्या सी.बी.एस.सी.ई.च्या परीक्षेत रामटेकच्या मुलींनी चांगले यश प्राप्त केले आहे. रामटेकच्या मुली हया मौदा तालुक्यातील पोद्दार, रीलायंस फाउंडेशन तसेच इतर शाळेत शिकत होते . आपल्या अथक प्रयत्नामुळे त्यांनी कोणतीही खाजगी वर्ग न लावता हे यश प्राप्त केले असल्याचे त्यांनी सांगीतले .रामटेकची अणुष्का राजेश नीबांळकर ही भारतीय वीद्या भवन्स हया शाळेतील वीद्दयार्थीनी असुन 94.3% गुण प्राप्त केले आहे.तीने आपल्या यशाचे श्रेय आईवडील व शिक्षकांना दिले आहे. तसेच जानव्ही रोहित संगेवार ही रीलांयस फाऊंडेशन स्कूल, मौदा येथील वीद्दयार्थीनी आहे.जान्हवी ने 91.60%एवढे गुण प्राप्त केले आहे.जानव्ही ही मध्यमवर्गाय कुटुंबातील वीद्दयार्थीनी असुन कोणताही खाजगी वर्ग लावला नाही. जानव्ही ने आपल्या यशाचे श्रेय शिक्षक,आईवडील, काका यांना दिले आहे.नीकालात मुलींनी बाजी मारली असल्याने सर्व स्तरातून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .
Published On :
Fri, May 10th, 2019
By Nagpur Today