Advertisement
कन्हान : – नागपुर रामटेक रेल्वे लाईन वर संताजी नगर कांद्री येथे गहुहिवरा रहिवासी सुनिल लक्षणे याचा रेल्वे अपघातात मुत्यु देह आढळला .
रविवार (दि.१६) ला सकाळी ७ वाजता दरम्यान रामटेक रेल्वे लाईनवर संताजी नगर कांद्री येथे सुनिल सुखदेव लक्षणे वय ४० वर्ष रा. गहुहिवरा याच्या डोक्याला गंभीर जखम व उजवा हात कटलेल्या अवस्थेत मुत्युदेह आढळल्याने बघणाऱ्यानी गर्दी केली .
कन्हान पोलीस स्टेशनला फिर्यादी लहान भाऊ दिपक सुखदेव लक्षणे वय ३८ वर्ष यांच्या तक्रारी वरून मर्ग दाखल करून पुढील तपास सुरू आहे . सुनिल लक्षणे यांच्या डोक्याला जबर जखम व फक्त उजवा हात रेल्वेने कटलेला असल्याने घातपात म्हणजे अपघात की हत्या अशी नागरिक चर्चा करित होते .