नागपूर : काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच रामटेकचे बंडखोर उमेदवार किशोर गजभिये यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला.हा त्यांच्यासाठी मोठा धक्का मनाला जात आहे. वंचित बहुजन आघाडीने शंकर चहांदे यांना पसंती दिल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. किशोर गजभिये यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे गजभिये यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला.
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन विकास आघाडीच्या वतीने गजभिये यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने त्यांना उमेदवारी देण्याचे जाहीरसुद्धा केले होते. तत्पूर्वी वंचितच्या वतीने भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर चहांदे यांनीही उमेदवारी दाखल केली होती.गजभिये यांनी अर्ज भरल्यानंतर राजकीय हालचाली सुरु झाल्याचे पाहायला मिळाले.
गजभिये यांच्यामुळे काँग्रेसच्या मतांचे विभाजन होणार असल्याने त्यांनी माघारी घ्यावी, असा दाबाव टाकला जात होता.
अखेर काँग्रेसच्या प्रयत्नांना यश आले.वंचित बहुजन आघाडीने त्यांच्याऐवजी चहांदे यांना पसंती दिली. चहांदे यांनाही वंचितने एबी फॉर्म दिला होता. त्यामुळे हा गजभियेसाठी मोठा धक्का मानला जात आहे