Published On : Mon, Jul 1st, 2024
By Nagpur Today Nagpur News

रामझुला ‘हिट अँड रन’ प्रकरण; जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आरोपी रितू मालूचे नागपूर पोलिसांसमोर आत्मसमर्पण !

Advertisement

Ritu Malu

नागपूर : रामझुला ‘हिट अँड रन’ प्रकरणातील मुख्य आरोपी रितू मालू हिचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तिने आज नागपूर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. रितिका मालू मालू दुपारी साडेतीन वाजता न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

रामझुल्यावर 25 फेब्रुवारी रोजी मद्यधुंद अवस्थेत भरधाव मर्सडिज कार चालवत रितिका मालूने दोन तरुणांना चिरडले. या अपघातात मोमीनपुरा येथील मोहम्मद हुसेन गुलाम मुस्तफा (34) आणि जाफर नगर येथील मोहम्मद आतिफ (32) यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर तहसील पोलिसांनी रितिकाविरुद्ध भादंवि कलम ३०४ (सदोष मनुष्यवध), (निष्काळजीपणाने २७९ वाहन चालविणे), ३३६ (मानवी जीव धोक्यात टाकणारी कृती करणे), ३३८ (गंभीर जखमी करणे), ४२७ (आर्थिक नुकसान करणे) आणि मोटर वाहन कायद्यातील कलम १८४ (भरधाव वेगात वाहन चालविणे) व १८५ (दारूच्या नशेत वाहन चालविणे) या गुन्ह्यांतर्गत एफआयआर दाखल केला.

Gold Rate
23 April 2025
Gold 24 KT 96,500 /-
Gold 22 KT 89,700 /-
Silver / Kg 96,800 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान आरोपी रितिका उर्फ रितू दिनेश मालू हिचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळल्यानंतर तिला अटक होणार हे निश्चित झाले होते. अटकेच्या अगोदरच रितू मालूने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. यापूर्वी नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयानेही तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.

Advertisement
Advertisement