Published On : Wed, Jun 23rd, 2021

राणा दाम्पत्य आक्रमक;मुख्यमंत्र्यांची विदेशात बेकायदा संपत्ती? ईडी, सीबीआयकडे तक्रार करणार रवी राणा

Advertisement

अमरावती: खासदार (Member of Parliament) नवनीत राणा (Navneet Rana) यांचे जात प्रमाणपत्र (caste certificate) रद्द करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने (High Court)दिला होता. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) स्थगिती दिल्यानंतर राणा दाम्पत्य शिवसेनेविरोधात आक्रमक झाले आहे. नवनीत राणा यांच्यानंतर आता त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी थेट मुख्यमंत्री (Chief Minister) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ‘मुख्यमंत्री ठाकरे यांची विदेशात मोठी बेकायदा संपत्ती असून त्याविरोधात ईडी व सीबीआयकडं तक्रार करणार आहे’, असा इशारा राणा यांनी दिला आहे.

रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांसह माजी खासदार आनंदराव अडसूळ व परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ‘सुमारे 8 वर्षांपूर्वी नवनीत राणा यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात सातत्याने तक्रारी केल्या. अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडे तक्रार केली. तिथे नवनीत राणा जिंकल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार स्थापन झालेल्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे 2013 साली तक्रार केली. तिथेही नवनीत जिंकल्या.

Gold Rate
Thursday 09 Jan. 2025
Gold 24 KT 77,900 /-
Gold 22 KT 72,500 /-
Silver / Kg 90,600 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ह्या सगळ्या निर्णयानंतरही उच्च न्यायालयानंतर दिलेला जातप्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय आमच्यासाठी धक्कादायक होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने योग्य न्याय देत अंतिम निर्णयापर्यंत स्थगिती दिली. त्यामुळे आम्हाला मोठा दिलासा मिळाला आहे,’ असे राणा म्हणाले. आता आम्ही स्वातंत्र्यापूर्वीपासूनची जवळपास 200 हून अधिक कागदपत्रे न्यायालयात सादर करणार आहोत. जेणेकरून ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ होऊन जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान उच्च न्यायालाने जात प्रमाणपत्र रद्द केल्याचा निर्णय दिला तेव्हा या सर्व गोष्टीं मागे शिवसेना असल्याचं आरोपही नवनीत राणा यांनी माध्यमाशी बोलताना केला होता. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिल्यानंतर ‘मुख्यमंत्र्यांवर आरोप करताना रवी राणा म्हणाले, ‘मुख्यमंत्री स्वत: अॅड. अनिल परब यांच्या माध्यमातून नवनीत राणा यांना टार्गेट करत आहेत. ते द्वेषाचे राजकारण करत आहेत.

मी स्वत: उद्धव ठाकरे यांच्या विदेशातील बेकायदा संपत्तीची, जमिनींची व घरांची माहिती घेतली आहे. ही सर्व माहिती ईडी आणि सीबीआयला देणार आहे व तातडीने कारवाईची मागणी करणार आहे,’ असे रवी राणा यांनी म्हटले आहे. त्याशिवाय, अनिल परब यांनी अलीकडेच एका बेकायदा रिसॉर्टचे बांधकाम केले आहे. स्वत:च्या नावावर ते करून घेतल आहे. याचीही माहिती मी घेतली असून त्याविषयी देखील तक्रार करणार आहे,’ असा इशारा राणा यांनी दिला आहे.

Advertisement