नागपूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री व ‘स्वाभिमान’ पक्षाचे अध्यक्ष यांच्या राज्य मंत्रीमंडळाच्या समावेशावरुन भाजपा-शिवसेनेमध्ये धुसफूस सुरू आहे. अशा स्थितीत नारायण राणे यांनी मंगळवारी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘रामगिरी’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली.
राणे यांच्या या अचानक भेटीमुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये दाखल झालेले नारायण राणे राजकीय पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत आहेत हे विशेष.
राणे यांच्या मंत्रीमंडळ समावेशावरुन विविध कयास लावण्यात येत आहेत. काँग्रेस सोडून स्वत:चा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काढणारे नारायण राणे यांचे लवकरच राजकीय पुनर्वसन केले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सकाळीच स्पष्ट केले होते. भाजपच्या कोट्यातून राणेंना मंत्रीपद देण्याचीदेखील मुख्यमंत्र्यांची तयारी आहे. या पार्श्वभूमीवर राणे यांची ही भेट अतिशय महत्त्वाची मानण्यात येत आहे.