मुंबई : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्ला यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल होते. मात्र मागील आतापर्यंत हिन्यात त्यांच्यावर मुंबई व पुण्यात दाखल असणारे सर्व गुन्हे उच्च न्यायालयाने रद्द ठरवले.
त्यापाठोपाठ सायबर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांचा तपासही बंद करण्यात आला. त्यानुसार आता त्यांची नियुक्ती पोलीस महासंचालक म्हणून करण्यात आली आहे.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महांचालकपदी श्रीमती रश्मी शुक्ला यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्याचे मन:पूर्वक अभिनंदन, असे सुधीर मुनगंटीवार यांनी ट्विट करत म्हटले आहे.
दरम्यान आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या फोन टॅपिंग प्रकरणी चर्चेत आल्या होत्या. विधानसभा निवडणूक 2019 च्या निकालानंतर काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.महाविकास आघाडी सरकारच्या काळात या प्रकरणाची चौकशीदेखील करण्यात आली होती.