Published On : Tue, Dec 19th, 2023
By Nagpur Today Nagpur News

जातीनिहाय जनगणनेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध ; राजकीय वातावरण तापले

नागपूर : बिहार राज्याने राज्यांतर्गत जातनिहाय जनगणना केली आहे. बिहारच्या धर्तीवर आता महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करण्यात यावी, या मागणीने जोर धरला आहे. मात्र जातीनिहाय जनगणनेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विरोध केल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

आरक्षणावर तोडगा काढायचा असेल तर जातीनिहाय जनगणना हाच उपाय असल्याचंही राजकीय नेत्यांकडून बोलले जात असताना संघाने याला विरोधक केल्याने सामाजिक संघटनांकडून विरोध करण्यात येत आहे.

Gold Rate
Wednesday 05 Feb. 2025
Gold 24 KT 84,400 /-
Gold 22 KT 78,500 /-
Silver / Kg 96,200 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.
सांगितली. जातीनिहाय जनगणना झाल्यास कमी संख्या असलेल्या समाजाच्या मनात न्यूनगंड किंवा जास्त संख्येनं असलेल्या समाजाच्या मनात वेगळी भावना निर्माण होईल असा तर्क त्यांनी यावेळी दिला.

जातीनिहाय जनगणना देशाला काय फायदा आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला. माझ्या मते जातीनिहाय जनगणनेचा काहीच फायदा नाही. त्यामुळे जातीनिहाय जनगणना करणे गरजेचे आहे असे मला वाटते नाही. तसेच ज्यांना वाटते की जातीनिहाय जनगणना करणे आवश्यक आहे, त्यांनी याचा काय फायदा होईल हे सांगावे, असेही ते म्हणाले.

या प्रकरणात राजकीय पक्षांचे आपआपले हेतू आहेत. त्यामुळंच मी म्हणतो, जे लोक म्हणताय की जातीनिहाय जनगणना करा, अशांनी अगोदर त्यामागचे फायदे काय आहेत ते सांगावं. तसंच याचा देशाला काय फायदा याची देखील माहिती त्यांनी द्यावी, असंही गाडगे यांनी म्हटलंय. शिंदे गटाचे आमदार आणि भाजपाच्या आमदारांनी आज संघ मुख्यालयाला भेट दिली. त्यानंतर गाडगे बोलत होते. यावेळी अजित पवार गटाचे आमदार संघ मुख्यालयामध्ये भेटीसाठी आले नव्हते. तसंच स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही संघ मुख्यालयामध्ये आलेले नव्हते.

दरम्यान महायुतीतील भाजपा व शिवसेनेच्या (शिंदे गट) आमदारांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील स्मृती मंदिराला भेट दिली. मात्र, यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गैरहजर होते.

Advertisement