नागपूर : उद्या मंगळवारी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध संगीतकार व गायक पदमश्री शंकर महादेवन उपस्थित राहणार आहेत. उद्या होणाऱ्या कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत स्वयंसेवकांना कोणत्या मुद्द्यांवर मार्गदर्शन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
२४ ऑक्टोबर रोजी रेशीमबाग मैदान येथे सकाळी ७.४० वाजता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी संघ स्वयंसेवक पथसंचलन करतील व त्यानंतर उपस्थित अतिथींसमोर विविध कवायतींचे प्रात्यक्षिक करण्यात येईल.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत अप्रत्यक्षपणे भाष्य करणार असल्याचे बोलले जात आहे. शातील वर्तमान सामाजिक व आर्थिक स्थिती, महागाईचा पडणारा भार, लोकसंख्या धोरणासह अनेक मुद्द्यांवर ते भाष्य करण्याची शक्यता आहे. सरसंघचालकांच्या भाषणातून संघाच्या भविष्यातील योजना व भूमिकांचे संकेत मिळत असतात. त्यामुळे या सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.