नागपूर: मध्यवर्ती नागपूर रेल्वेस्थानक म्हणजे उंदरांचे माहेरघर… असे म्हटल्यास काहीच हरकत नाही. कारण याठिकाणी पाच पन्नास नव्हे तर उंदरांची अख्खी वसाहत आहे. सायंकाळ होताच झुंडचा झुंड निघतो. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आठवड्यातून औषधांचा वापर केला जातो. महिण्याकाठी जवळपास २०० उंदिर कमी होतात, अशी माहिती सुत्राकडून मिळाली आहे.
रेल्वे सुत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार रेल्वे स्थानकाच्या खालीच उंदरांची वसाहत आहे. रेल्वे रुळाशेजारी त्यांचे बिळ आहेत. फलाटावर गाडी थांबली की, प्रवासी खाद्य पदार्थांचे रिकामे पॅकेट तर कधी अन्नही रुळावर फेकतात. त्यामुळे उंदरांची संख्या वाढत आहे. उंदरांवर नियंत्रण मिळविण्यासाठी रेल्वे कडून प्रयत्न केले जातात. स्टेशन सफाईचे कंत्राट ज्यांच्याकडे आहे. त्यांच्याकडेच उंदिरांची संख्या कमी करण्याची जबाबदारी आहे. यासाठी एक विशिष्ट व्यक्ती नेमला आहे. तो मिश्रनात औषधी घालुन उंदरांना खायला घालतो. त्यामुळे आठवड्यात ५० या अर्थाने महिण्याकाठी २०० च्यावर संख्या कमी होत आहे.
उंदरांचा झुंड आल्यास प्रवाशांनाही पळावे लागते, अशी अनेकदा स्थिती उद्भवली आहे. शिवाय रुळाशेजारी बिळ असल्याने सिग्नलिंग केबल कुरतडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. सिग्नलिंग केबल कुरतडल्यास रेल्वे संचालनात अडथळा निर्माण होऊ शकतो. यावर चंदीगढ कृषी विद्यापीठाने उंदरांची संख्या कमी करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित केले. मध्य रेल्वे नागपूर विभागातील अधिकारी चंदीगढलाही जाऊन आले. मात्र, त्याचे पुढे काय झाले याविषयी माहिती नाही. परंतु आजही उंदरांची संख्या वाढतीवर असल्याने यावर कायमस्वरुपी तोडगा काढने गरजेचे झाले आहे.