Advertisement
नागपूर : डिसेंबर महिन्यात थंडी जोरात सुरू आहे. उपराजधानीत रविवारी थंडीने आपला विक्रम मोडला. नागपूर जिल्ह्यातील किमान तापमान सात अंश सेल्सिअसवर पोहोचल्याचे हवामान खात्याने सांगितले.रविवार हा या मोसमातील सर्वात थंड दिवस होता.
डिसेंबर महिना संपत आला असताना नागपुरात थंडी वाढत आहे. थंडीची लाट उसळली की जाणवते तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. नागपुरातच नव्हे तर संपूर्ण विदर्भात थंडीची लाट सुरू आहे. दहाही जिल्ह्यांत हीच परिस्थिती कायम आहे.