Published On : Sun, Jan 26th, 2025
By Nagpur Today Nagpur News

कोळसा खाणीत कर्मचाऱ्यांचे रोस्टर नियमित करुन अनुपालन अहवाल सादर करा -धर्मपाल मेश्राम

नागपूर, : सर्व कोळसा खाणीतील अनुसूचित जाती व जमातीच्या कर्मचाऱ्यांचे आरक्षण रोस्टर नियमित करुन अनुपालन अहवाल सादर करा. या सोबतच सर्व युनिटच्या ट्रेड युनियन व सिस्टा आणि एससी, एसटी व ओबीसी कर्मचारी युनियनच्या सदस्यासह सात कोळसा खाणीच्या संपर्क अधिकाऱ्यांना पुढील बैठकीस आमंत्रित करण्याचे निदेश महाराष्ट्र अनुसुचित जाती व जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी संबंधितांना दिले.

Gold Rate
Monday 27 Jan. 2025
Gold 24 KT 80,400 /-
Gold 22 KT 74,800 /-
Silver / Kg 90,900 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कोळसा खाणी बाबत आढावा बैठक रवी भवन येथे घेण्यात आली यावेळी महाप्रबंधक ए.के. सिंग, सुजीत सेन, उपमहाप्रबंधक आर. के. सिंग व कोळसा खाणीचे संपर्क अधिकारी अतुल बनसोड उपस्थित होते.

अनुसूचित जाती व जमातीच्या कर्मचा-यांसाठी खाणींच्या प्रशासनाने कोणत्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या. आरोग्य विषयक कोणत्या उपाययोजना केल्या आहेत याबाबत सविस्तर माहिती श्री. मेश्राम यांनी घेतली, कोणत्याही अनुसूचित जाती व जमातीच्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही, आरक्षणाबाबत तक्रार येणार नाही, याबाबत दक्षता घ्या, अशा सूचना त्यांनी केल्या व खाणीमध्ये किती मागासवर्गीय कर्मचारी आहेत. तसेच कर्मचारी अंतर्गत भरती व सरळ भरती बाबत माहिती जाणून घेतली.

सर्व खाणीत ३२ हजार ४४३ कर्मचारी असून यात ६ हजार ४५२ अनुसूचित जाती व अनुचित जमातीचे १ हजार ६८८ कर्मचारी कार्यरत असून त्यांना नियमानुसार आरक्षण मिळावेत, असे त्यांनी सांगितले.

Advertisement