नागपूर : विजय सी.सोनारघरे सेवानिवृत्त यांनी लिहिलेल्या “भावस्पंद ” पुस्तकाचे विमोचन.” स्नेह विजय ” उदय नगर मानेवाडा रिंग रोड, नागपूर येथील रहिवासी विजय सोनारघरे यांनी कोरोना काळात “भावस्पंद ” हे पुस्तक लिहिले असून त्यांच्या राहत्या घरी बालगोपालांच्या उपस्थितीत पुस्तकाचे विमोचन मार्च २६ , २०२१ रोजी घरीच करण्यात आले. नागपुरातील भारतीय खाद्य निगम जिल्हा कार्यालय अजनी नागपूर येथून प्रबंधक पदावरून निवृत्त झालेल्या विजय सोनारघरे यांचा हा दुसरा लेखसंग्रह आहे.
या पूर्वीचा त्यांचा विविध विषयांवरील लेखांचा “वास्तव ” हा लेख संग्रह 2017 ला प्रकाशित झालेला असून दैनिक महाराष्ट्र टाइम्स नागपूर वृत्तसमूहाचे संपादक श्रीपाद अपराजित यांची त्याला प्रस्तावना लाभलेली आहे. “भावस्पंद ” हे कथानक वाचकांच्या हाती देताना ‘प्राप्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक वाटतो’ याशिवाय या कथांना का मध्ये विचार मांडतांना मला सामाजिक, स्त्रीविषयक, अध्यात्मिक तसेच कौटुंबिक जिव्हाळ्याची मनाच्या गाभाऱ्यातून सौंदर्याची खऱ्या अर्थाने अनुभूती येते. भावस्पंद यामधील विचार परिस्थिती वास्तविकतेशी पूर्णता रूपाने समरस असून काही अशी काल्पनिक व सत्यतेवर आधारित आहे.
आपणा सर्वांना या पुस्तकाची आवश्यकता आहे. मानवाला जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघणे. मनात सात्विक भाव ठेवणे. स्वतःच्या तत्त्व बुद्धांची समरस असणे. परिवारांची एक रूप तसेच समाज रचनेची तत्त्वे अंमलात आणली तर आपले सर्वांची आयुष्य अधिक सुकर व समृद्ध होईल. आणि प्रगती करेल आपण सर्वांना ही पुस्तक आयुष्यात प्रगतीकडे वाटचाल करताना प्रेरणादायी ठरेल. व इतर विविधांगी विषयावर भर-भक्कम पणे लिहिले गेले आहे.
पुस्तक लिहिताना त्यामध्ये त्यांची पत्नी सौ.सेन्हा चा सिंहाचा वाटा असून या पुस्तकाचे घरीच छोटे छोटे बाल गोपालांच्या उपस्थितीत पुस्तकांचे विमोचन पार पडले. याप्रसंगी चि. स्मित सातपुते, कु.ज्यानव्ही थडीले, कु. रुद्राक्षी थडीले, कु. साक्षी दोनोडे कु. आनंदी वैघ तसेच कु. स्वरा जाधव यावेळी प्रामुख्याने उपस्थित समारंभ साध्या पद्धतीने पार पडला.
–
विजय सी.सोनारघरे सेवानिवृत्त यांनी लिहिलेल्या “भावस्पंद ” पुस्तकाचे विमोचन