Published On : Mon, Feb 28th, 2022
By Nagpur Today Nagpur News

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कार्यअहवालाचे विमोचन

Advertisement

प्रभाग १६च्या नगरसेवकांनी ठेवला जनतेपुढे कामाचा लेखाजोखा

नागपूर: राज्याचे माजी मुख्यमंत्री विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रभाग १६चे नगरसेवक शहराचे माजी महापौर संदीप जोशी यांच्यासह नगरसेवक लखन येरावार, नगरसेविका वनिता दांडेकर, लक्ष्मी यादव यांच्या कार्यअहवालांचे नुकतेच विमोचन झाले.

Today’s Rate
Saturday 05 Oct. 2024
Gold 24 KT 76,100/-
Gold 22 KT 70,800/-
Silver / Kg 93,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मागील पाच वर्षात प्रभागातील जनतेच्या सुविधेच्या दृष्टीने करण्यात आलेली विकासकामे, निर्माण केलेल्या सोयी सुविधा या सर्व कार्याचा लेखाजोखा चारही नगरसेवकांनी एकत्रितरित्या कार्यअहवालात मांडला आहे. या कार्यअहवालाचे विमोचन करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कार्यअहवालाचे कौतुक करीत पुढील वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

Advertisement

प्रभाग १६च्या जनतेचे मनपाच्या सभागृहात प्रतिनिधित्व करतानाच संदीप जोशी यांना शहराचे प्रथम नागरिक म्हणून बहुमान मिळाला. जनतेने दाखविलेल्या विश्वासाला महापौर म्हणून त्यांनी आपल्या प्रत्येक निर्णयातून सार्थ ठरविण्याचा प्रयत्न केला. कोरोना या वैश्विक महामारीच्या काळात निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापौर या नात्याने संदीप जोशी यांनी जनजागृतीसाठी रस्त्यावर उतरून लोकांना सुरक्षेचे आवाहन केले. गरीब, गरजूंच्या दोनवेळच्या अन्नाची आबाळ होऊ नये यासाठी त्यांच्या नेतृत्वात मनपाद्वारे शहरातील विविध भागात भोजन वितरण करण्यात आले. नगरसेवक म्हणून स्वत:ही त्यांनी प्रभाग १६च्या विविध भागात भोजन वितरण, औषध वितरणासह आरोग्य शिबिरे घेतली.

प्रभाग १६च्या नगरसेविका तारा (लक्ष्मी) यादव यांनीही गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती सभापती म्हणून शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना विविध योजनांच्या माध्यमातून लाभ पोहोचवून देण्यासाठी प्रयत्न केले. नगरसेवक लखन येरवार, नगरसेविका वनिता दांडेकर यांनीही प्रभागात विविध कार्य करून जनतेला दिलासा मिळवून देण्यासाठी कार्य केले. कोरोना काळात सर्व नगरसेवकांनी प्रभागातील विविध भागांमध्ये केलेले कार्य उल्लेखनीय आहेत.