Published On : Mon, Feb 19th, 2024
By Nagpur Today Nagpur News

भाजपचे माजी आमदार सागर मेघेंना दिलासा; निडणूक प्रचारादरम्यान कारमध्ये सापडलेल्या रोख रक्कम प्रकरणाचा खटला हायकोर्टाकडून रद्द !

Advertisement

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शनिवारी महाराष्ट्राचे माजी आमदार सागर मेघे यांच्याविरुद्ध २०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान दाखल केलेल्या गुन्ह्यात दाखल केलेले आरोपपत्र फेटाळले. न्यायमूर्ती विनय जोशी आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या खंडपीठाने म्हटले की, पोलिसांनी आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी योग्य ती दक्षता घेतली पाहिजे, असे म्हणत न्यायालयाने पोलिसांना फटकारले आहे.

सागर मेघे यांच्याविरुद्धचा खटला 2014 चा आहे, जेव्हा त्यांनी वर्धा लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती.निवडणूक प्रचारादरम्यान 4.75 लाख रुपये रोख रक्कम निवडणूक साहित्य, दोन दारूच्या बाटल्या आणि स्टिकर्सने भरलेले वाहन पोलिसांनी अडवल्यानंतर आरोपपत्र दाखल करण्यात आले. सागरच्या निवडणूक प्रचारासाठी हे वाहन वापरण्यात आल्याचा आरोप असून अमरावती जिल्ह्यातील दत्तपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Gold Rate
Thursday 09 Jan. 2025
Gold 24 KT 77,900 /-
Gold 22 KT 72,500 /-
Silver / Kg 90,600 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सागर आणि इतरांवर लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम १२३ (भ्रष्ट व्यवहार) आणि कलम १७१-एच (निवडणुकीच्या संदर्भात बेकायदेशीर पेमेंट) आणि १८८ (लोकसेवकाने जारी केलेल्या आदेशाची अवज्ञा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सागर मेघे यांचे वकील एस.व्ही. मनोहर आणि शंतनू खेडकर यांनी त्यांची बाजू मांडत , मेघे यांच्याविरुद्ध लावण्यात आलेली कलमे खटल्यातील तथ्यांशी जुळत नसल्याचे म्हटले.

Advertisement