नागपूर : वानाडोंगरी परिसरातील स्कूल ऑफ स्कॉलर्स (एसओएस) कॉलेजचा स्लॅब शनिवारी कोसळल्याने एका सुरक्षा कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून रवींद्र उमरेडकर असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेघे ग्रुपची शैक्षणिक संस्था असलेल्या एसओएस कॉलेजचे बांधकाम सुरु आहे. शनिवारी इमारतीच्या स्लॅबचा काही भाग अचानक कोसळल्याने रवींद्र ढिगाऱ्याखाली आले त्यात ते जागीच ठार झाल्याची माहिती आहे.
दरम्यान, पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा अधिक तपास सुरू आहे.